रावसाहेब दानवेंचे हेलिकॉप्टर भरकटले

Foto

परभणी- भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टरच्या पायलटला अक्षांश, रेखांश न सापडल्यामुळे हेलिकॉप्टरची वाट चुकली. खा. दानवे सध्या परभणी दौर्‍यावर आहेत. दानवे यांचे हेलिकॉप्टर विद्यापीठात लँड केले जाणार होते; परंतु अक्षांश, रेखांश न मिळाल्याने हेलिकॉप्टरची वाट चुकली व हेलिकॉप्टरने आकाशात तीन घिरट्या घेतल्या. पायलटने हे हेलिकॉप्टर थेट पोलिस मुख्यालयात नेले. त्यानंतर विद्यापीठातील अधिकार्‍यांशी फोनवरून बोलल्यानंतर पायलटने हेलिकॉप्टर विद्यापीठाकडे वळवले.